महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय टपाल तिकिटांचा संग्रह; २ पैशापासून ते ५० रुपयापर्यंतच्या सर्व तिकीटांचा समावेश - laxmikant deshmukh post office tickit jalna

पोस्ट खात्याच्या मेळाव्यानिमित्त जुन्या जालन्यातील पोस्ट ऑफिसमध्ये देशमुख यांच्या संग्रहित टपाल तिकिटांचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवर २ पैशापासून ते ५० रुपयापर्यंतच्या सर्व तिकीटांचा समावेश होता. फक्त भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय तिकिटे देखील इथे पाहायला मिळाली.

jalna
टपाल टिकीट संग्रह

By

Published : Jan 18, 2020, 11:48 AM IST

जालना- प्रत्येक छंदामधून काही ना काही तरी कलागुण जोपासले जातात. आणि त्यातून आपल्यामधील सुप्त गुणांना वाव मिळतो. त्यामुळे, कोणताही छंद जोपासा, असे आवाहन गेल्या ४० वर्षांपासून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय टपाल तिकिटांचा संग्रह करणारे लक्ष्मीकांत वसंतराव देशमुख यांनी केले आहे.

टपाल टिकीट संग्रहाबाबत माहिती देतना लक्ष्मीकांत देशमुख

पोस्ट खात्याच्या मेळाव्यानिमित्त जुन्या जालन्यातील पोस्ट ऑफिसमध्ये देशमुख यांच्या संग्रहित टपाल तिकिटांचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवर २ पैशापासून ते ५० रुपयापर्यंतच्या सर्व तिकीटांचा समावेश होता. फक्त भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय तिकिटे देखील इथे पाहायला मिळाली. शालेय विद्यार्थ्यांनी देखील या तिकिटांना पाहून माहिती घेतली. दरम्यान, गेल्या ४० वर्षांपासून देशमुख यांनी जोपासलेल्या या ठेव्याची शासन दरबारी दखल घेऊन या तिकिटांच्या देखभालिसाठी फूल नाहीतर फुलाची पाकळी तरी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.

हेही वाचा-हात उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून पोलिसावर प्राणघातक हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details