जालना - शहरामध्ये 2004 पासून सुरू असलेला इंडस राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प 30 नोव्हेंबर 19 रोजी बंद करण्यात आला. मात्र, या ठिकाणी काम करणाऱ्या सुमारे अडीचशे शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसुचना न देता 12 डिसेंबरला तोंडी आदेश देऊन कार्यमुक्त केले.
थकीत मानधन द्या, अन्यथा उपोषण हेही वाचा-शिर्डी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, दुपारी २ वाजता बैठक
प्रत्यक्षात मात्र गेल्या 16 वर्षांपासून या प्रकल्पात अनेक महिला पुरुष कार्यरत आहेत. असे असताना कोणतीही सूचना न देता जून 2019 ते डिसेंबर 2019 अशा सहा महिन्यांचे मानधनही थकले आहे. त्यामुळे हे मानधन त्वरित देण्यात यावे, प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना इतर कुठल्याही शासकीय सेवेत किंवा प्रकल्पामध्ये सामावून घ्यावे, रोजगार उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी प्रकल्पातील केंद्रप्रमुख व शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
26 जानेवारीपर्यंत जर मानधन मिळाले नाही तर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यातही आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या निवेदनावर आशा भालेकर, रेणुका शेटे, शेख रेहाना, कांचन रामदासी, सुनिता मुळजकर, बबलू जोडीवाले, वैशाली दंडे, कांचन बिबेकर, वैशाली दंडे, यांना सह्या आहेत.