जालना -आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी नरेंद्र पाटलांनी केली आहे. शहरात राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाटील बोलत होते. श्रीमंत संभाजीराजे छत्रपतींचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.
आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे; नरेंद्र पाटलांची जालन्यात मागणी - जालना मराठा आरक्षण बातमी
आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी नरेंद्र पाटलांनी केली आहे. शहरात राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाटील बोलत होते. श्रीमंत संभाजीराजे छत्रपतींचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.
'आमच्या आरक्षणाविषयी काही लोक न्यायालयात गेले आहेत. खरेतर त्यांना काहीही धक्का न लागता आम्ही आमचे आरक्षण मागितले आहे. मात्र, त्यांचे पोट दुखत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील काही मुदतीसाठी हे आरक्षण दिले होते. तो मुद्दा आता हे विसरले आहेत आणि आमच्या विरोधात घराघरांमध्ये जाऊन दोन चार लोकांना गोळा करून गैरसमज पसरवत आहेत. एवढी जर खुमखुमी असेल तर एकदा आर्थिक निकषावर आरक्षण होऊनच जाऊ द्या, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, नुकत्याच पुढे ढकललेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेविषयी बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने मंदिरे बंद ठेवले. रेल्वे बंद ठेवल्या. शाळा बंद ठेवल्या. याच धोरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आणि तोच निर्णय राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या संदर्भातही घेतला. जेणेकरून महामारीला तोंड देता येईल. मात्र, काही जण न्यायालयात जाऊन मराठा समाजाच्या आरक्षणामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत अशा अफवा पसरवत आहेत. खरे तर या परीक्षांचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.