जालना - अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मला कमी करण्यात आले, हा मी मराठा समाजसाठी सरकारच्या विरोधात बोलण्याचा परिणाम आहे. असा आरोप अण्णासाहे पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आघाडी सरकारवर केला. सरकारच्या मतानुसार वागायला आम्ही सरकारचे गुलाम नाही,असा घणाघात त्यांनी केला.
आम्ही सरकारचे गुलाम नाही - नरेंद्र पाटील आम्हीच सरकारचे गुलाम नाही -
अध्यक्षपदावरून कमी केले हा सरकारवर टीका केल्याचा परिणाम आहे. मात्र, मराठा समाजासाठी माझ्या वडिलांनीही बलिदान दिला आहे. आम्ही जातिवंत मराठा, आहोत त्यामुळे सरकार म्हणेल तसेच वागायला आम्ही काही सरकारचे गुलाम नाहीत असा, टीका नरेंद्र पाटील यांनी आघाडी सरकारवर केली. फडणवीस सरकारने या महामंडळासाठी चांगले काम केले. मात्र, आघाडी सरकारने आत्तापर्यंत या महामंडळाला एक रुपया देखील दिला नाही, आणि हे जाणीवपूर्वक केल्या जात आहे.
मराठा मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गायकवाड समिती (मागासवर्गीय आयोग) खोटा ठरविला आहे. एखादा जबाबदार मंत्री जर अशा आयोगाला खोटा ठरवत असेल तर सरकारने त्यांना जाब विचारणे अपेक्षित आहे. आघाडी सरकारच्या तीनही पक्षांमध्ये मराठा समाजाचे मंत्री आहेत. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सह कोणत्याच मंत्र्याने विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत केली नाही. हे सर्वजण का घाबरतात? एवढेच नव्हे तर मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील विजय वडेट्टीवार यांना काहीच विचारत नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे की या दोघांनाही मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणे घालण्या मध्ये हे स्वारस्य आहे. जेणेकरून मराठा समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल.
मराठा समाजाचे मंत्री स्वतःचे घर भरत आहेत -
मंत्रिमंडळात तिन्ही पक्षामध्ये मराठा समाजाचे मंत्री आहेत. मात्र, समाजासाठी काहीही काम न करता स्वतःचे घर भरण्याचे काम हे मंत्री करीत आहेत. विजय वडेट्टीवार हे जालन्यात येतात आणि मराठा समाजाचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात बोलतात तरी देखील मराठा समाजाचा मंत्री म्हणून राजेश टोपे काहीच बोलत नसतील तर त्यांनी तर राजीनामा द्यावा. त्यांच्यासोबत मराठा समाजातील सर्वच मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणीही ही नरेंद्र पाटील यांनी करून मराठा समाजाने स्वतःची घरे भरणाऱ्या या मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे .असे आवाहनही त्यांनी केले .