जालना -परतूर शहरामध्ये शारजा मैदानावर आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास कुंदन घनश्याम खंडेलवाल (वय 20) या युवकाचा मृतदेह आढळला. कुंदनची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या दहा दिवसातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे, शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे .
परतूरमध्ये भरदिवसा तरुणाचा खून; दहा दिवसांतील दुसरी घटना - कुंदन घनश्याम खंडेलवाल
परतूर शहरामध्ये शारजा मैदानावर आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास कुंदन घनश्याम खंडेलवाल (वय 20) या युवकाचा मृतदेह आढळला. कुंदनची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कुंदन घनश्याम खंडेलवाल
कुंदन हा के.के. फ्रेंड्स क्लबचा अध्यक्ष होता. तसेच, शहरामध्ये नुकत्याच झालेल्या दहीहंडी कार्यक्रम समितीचा सदस्य देखील होता. त्याची शहरात विशेषत: तरुणांमध्ये चांगली ओळख होती. या घटनेने शहर हादरले असून, घटनास्थळी लोकांनी गर्दी होती.
सदरील घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेसंबंधी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढलेला दिसत आहे.
Last Updated : Aug 31, 2019, 11:46 PM IST