परभणी - विवाहितेचे अश्लील फोटो समाजमाध्यमावर टाकल्याच्या रागातून तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील पिंपळवाडी येथे काल (बुधवार) रात्री उशीरा घडली. संतोष डिघोळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, तीन संशयीतांविरोधात चारठाणा पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगडाने मारहाण करून हत्या -
संतोष डिघोळे याचे या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये भांडण झाले. त्यानंतर माहेरी आलेल्या विवाहितेला संतोष डिघोळे हा त्रास देत होता. महिलेसोबत असलेले फोटो समाजमाध्यमांवर टाकून तिची बदनामी करत होता. याचा राग अनावर झाल्याने महिलेच्या नातेवाईकांनी संतोष डिघोळे याला खैरी येथे बोलावू त्याला दगडाने मारहाण करून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
हेही वाचा -राज्यात 'म्यूकरमायकोसिस'चे पंधराशेच्यावर रुग्ण - राजेश टोपे
हेही वाचा -देशातच नाही तर जगात पंतप्रधान मोदींची थू थू होतेय - नाना पटोले