जालना - नूतन पोलीस अधीक्षक म्हणून विनायक देशमुख यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी ही सूत्रे दिली. मुंबई येथून बदलून आलेले नूतन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे निश्चितच देशमुख यांना पहिल्यांदाच ही नियुक्ती मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीची पद्धत जाणून घेण्यासाठी जालन्यातील प्रसारमाध्यमांना उत्सुकता होती. त्यामुळे त्यांच्या आगमनापूर्वीच ही माध्यमे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपस्थित होते.
विनायक देशमुख यांनी स्वीकारली नूतन पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे - जालना नुतन पोलीस अधीक्षक बातमी
नूतन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्यासमोर गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असलेली संघटित गुन्हेगारी, गोळीबार प्रकरण, व्यापारी खून प्रकरण, तसेच जालन्यामध्ये दर महिन्या-दोन महिन्यांनी सापडणारी अग्निशस्त्रे (पिस्तुले) आणि जिवंत काडतुसे याच्यावर नियंत्रण मिळवून तपास करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे जालना शहरातील विस्कळीत असलेल्या वाहतुकीला शिस्त लावणे.
नूतन अधीक्षकांचे आगमन झाले, पदभार देणेघेणे झाले. मात्र, प्रसारमाध्यमांना बोलणे नूतन पोलीस अधीक्षकांनी टाळले. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रसारमाध्यमांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान मुंबई पोलिसांचा दरारा सर्वांनाच माहित आहे त्यामुळे मुंबईहून आलेले हे पोलीस अधिकारी आता आपला दरारा कशा पद्धतीने निर्माण करतात हे लवकरच दिसणार आहे.
नूतन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्यासमोर गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असलेली संघटित गुन्हेगारी, गोळीबार प्रकरण, व्यापारी खून प्रकरण, तसेच जालन्यामध्ये दर महिन्या-दोन महिन्यांनी सापडणारी अग्निशस्त्रे (पिस्तुले) आणि जिवंत काडतुसे याच्यावर नियंत्रण मिळवून तपास करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे जालना शहरातील विस्कळीत असलेल्या वाहतुकीला शिस्त लावणे. सध्या असलेली शहर वाहतुकीची शाखा ही केवळ नावापुरतीच आहे. पोलीस महानिरीक्षक मुत्याल यांनी जालना जिल्हा दौरा केला. त्यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांना चांगलेच धारेवर धरले होते. सुधारणा करण्याच्या सुचनाही उघडपणे दिल्या होत्या. मात्र, त्याचा परिणाम काहीही वाहतूक शाखेवर झालेला दिसत नाही. त्यामुळे वाहनधारकांना शिस्त लावण्यापेक्षा वाहतूक शाखेला शिस्त लावणे हीच एक मोठी जबाबदारी नूतन पोलीस अधीक्षकांवर आहे.