जालना -महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य असून देशातील इतर राज्यांपेक्षा सर्वात सुरक्षित राज्य आहे. त्यामुळे मुलीला महाराष्ट्रात ठेवायला हवे की नको हा प्रश्न पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड यांना विचारायला हवा, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे. पक्ष वाढवण्याचा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना अधिकार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांनी युती करायची की नाही याचा निर्णय स्थानिक नेते घेतील, असेही बारणे यांनी म्हटले आहे. ते जालन्यात बोलत होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक नेते घेतील - श्रीरंग बारणे - खासदार श्रीरंग बारणे यांची जालन्यात प्रतिक्रिया
महाराष्ट्र हे अठरा पगड जातींच्या लोकांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य, महाराष्ट्रात मुलीला ठेवायचे की नाही हा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारायला हवा. माणूस बोलण्याच्या ओघात बोलून जातो. आव्हाड यांच्या मुलीबद्दलच्या वक्तव्याचा विपर्यास केले गेल्याचेही खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र हे अठरा पगड जातींच्या लोकांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य, महाराष्ट्रात मुलीला ठेवायचे की नाही हा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारायला हवा. माणूस बोलण्याच्या ओघात बोलून जातो. आव्हाड यांच्या मुलीबद्दलच्या वक्तव्याचा विपर्यास केले गेल्याचेही खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून शिवसैनिकांची कामे होत नाहीत. याबाबत शिवसैनिकांकडून सूचना प्राप्त झाल्या असून याचा अहवाल पक्षप्रमुखांना सोपवणार असल्याचे देखील बारणे यांनी म्हटले आहे. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीत असणाऱ्या सहकारी पक्षातील आमदारांच्या भाजपा प्रेमाचा अहवाल स्थानिक शिवसेना नेत्यांकडून घेतला असून महाविकास आघाडीतील नेते एकत्रित बसून यावर निर्णय घेतील, अशी प्रतिक्रियाही खासदार बारणे यांनी दिली आहे.
हेही वाचा -Notice To Prasad Lad : अद्याप कोणतीही नोटीस नाही; आमदार लाड यांचा खुलासा