महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shrirang Barne on NCP : राष्ट्रवादीने आपले कार्यकर्ते आवरावे - खासदार श्रीरंग बारणे - श्रीरंग बारणे अर्जुन खोतकर बदनापूर बातमी

राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचू नये, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मावळ मतदार संघावर दावा करण्याचा प्रयत्न करणारे बोलविता धनी वेगळेच, त्यांचा शोध घेण्याची आता वेळ आली, असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले आहेत. ( MP Shrirang Barne on NCP ) तर जालन्यात काँग्रेस शिवसेनेला डिवचत असून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपचे प्रवक्ते झाल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केला. ( Arjun Khotkar Criticize Bjp )

Shrirang Barne
श्रीरंग बारणे

By

Published : Mar 22, 2022, 6:13 PM IST

जालना -राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचू नये, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मावळ मतदार संघावर दावा करण्याचा प्रयत्न करणारे बोलविता धनी वेगळेच, त्यांचा शोध घेण्याची आता वेळ आली, असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले आहेत. ( MP Shrirang Barne on NCP ) तर जालन्यात काँग्रेस शिवसेनेला डिवचत असून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपचे प्रवक्ते झाल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केला. ( Arjun Khotkar Criticize Bjp ) जालन्यात काँग्रेसची भाजप झाली आहे. त्यांना गाडण्याची आमच्यात ताकद आहे, या शब्दात अर्जुन खोतकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पाहा, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर काय म्हणाले?

मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी -

लोकसभा निवडणुकीला अजून 2 वर्ष बाकी आहेत. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघावर दावा करून राष्ट्रवादीने संभ्रम अवस्था निर्माण करू नये, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. मावळ लोकसभेची जागा पार्थ पवार यांच्यासाठी सोडण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी सोशल मिडियावर पोस्ट टाकून केली आहे. तर यानंतर बारणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मावळ लोकसभेची जागा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मागण्यात येत असली तरी यामागील कर्तेधर्ते वेगवेळेच असून त्यांचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा -Vinayak Raut Criticized Devendra Fadnavis : 'देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केला'

महाविकास आघाडीतुन शिवसेनेला डिवचण्याचे काम राष्ट्रवादी करत असेल तर त्यांनादेखील शिवसेना त्याचपद्धतीने शिवसेना उत्तर देईल, असंही बारणे यांनी म्हटलं. मावळच्या जागेबाबत उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं. माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री चांगला निधी देत असल्याने चांगली कामे होत असल्याचं सांगत राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचू नये, असंही बारणे यांनी म्हटलं.

ABOUT THE AUTHOR

...view details