महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारतीय जनता पक्ष आता वटवृक्ष झाला आहे - खासदार दानवे - जालना खासदार दानवे

भारतीय जनता पक्षाच्या गेल्या चाळीस वर्षांच्या आठवणींना उजाळा देताना खासदार दानवे यांनी विविध आठवणींना उजाळा दिला आहे. शिवाय आपल्या कुटुंबावर जनसंघ आणि संघ परिवाराचे विचार रुजलेले असल्यामुळे आपण भारतीय जनता पक्षात आहोत असे ते म्हणाले.

दानवे
दानवे

By

Published : Apr 7, 2021, 10:04 PM IST

Updated : Apr 7, 2021, 10:52 PM IST

जालना -भारतीय जनता पक्ष आता वटवृक्ष झाला आहे. त्याची पाळेमुळे मजबूत झाली आहेत. असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते.

खासदार दानवे
6 एप्रिल 1980 ला दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्या वेळेपासून भारतीय जनता पक्षाची घोडदौड सुरू झाली, आणि आज देशाच्या सर्वोच्च स्थानावर पंतप्रधानाच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकत आहे. असे भावना खासदार रावसाहेब दानवे बोलून दाखवली आहे. भारतीय जनता पक्षाच्या गेल्या चाळीस वर्षांच्या आठवणींना उजाळा देताना खासदार दानवे यांनी विविध आठवणींना उजाळा दिला आहे. शिवाय आपल्या कुटूंबावर जनसंघ आणि संघ परिवाराचे विचार रुजलेली असल्यामुळे आपण भारतीय जनता पक्षात आहोत. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेले भाषण आपल्यासाठी प्रेरणादायी ठरले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.हेही वाचा-नागपुरात कोरोना परिस्थिती गंभीर; इमारतीतील रहिवासियांवर कडक निर्बंध
Last Updated : Apr 7, 2021, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details