महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करा, बैलांना घेऊन शेतकऱ्यांचे आंदोलन - जालना आंदोलन

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करावी. शंकरपट पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी जालन्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जालना
जालना

By

Published : Aug 11, 2021, 6:48 PM IST

जालना - बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करावी. शंकरपट (बैलांच्या शर्यती) पुन्हा सुरू करावा. या मागणीसाठी जालन्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जालन्यातील अंबड चौफुला चौकात अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बैलगाडी शर्यतीत सहभागी होणारे शेतकरी सहभागी झाले होते.

बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी जालन्यात आंदोलन

बैल आंदोलनात

आंदोलक शेतकऱ्यांनी बैलगाडी शर्यत सुरु करण्याच्या मागणीसाठी बैलांना आंदोलनात आणले. पेटा हटवण्याची मागणी करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे जालना-मंठा, जालना-बिड महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती.

मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाला आणखी धार देऊ- आंदोलक

'पेटाने शंकरपट आणि बैलगाडी शर्यतीवर आक्षेप घेतल्याने बैलांचा सांभाळ करण्यास कठीण जात आहे. शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे तातडीने सरकारने बैलगाडी शर्यत आणि शंकरपट सुरु करावे', अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास आणखी आंदोलनाला धार देऊ, असा ईशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला.

हेही वाचा -चूक करूनही स्वतःची पाठ थोपटण्याचा आत्मविश्वास येतो कुठून? संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

ABOUT THE AUTHOR

...view details