महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक..! दिवसभरात 306 नवे कोरोनाग्रस्त, 704 झाले कोरोनामुक्त - coronavirus update jalna

जालना जिल्ह्यात दिवसभरात 306 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप 2 हजार 990 संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे. जिल्ह्याच्या विविध कोविड रुग्णालयातून आज 704 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

कोविड रुग्णालय
कोविड रुग्णालय

By

Published : May 4, 2021, 6:40 PM IST

जालना -गेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा आज (दि. 4 मे) घसरल्याचे दिसत आहे. दिवसभरामध्ये 306 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. मात्र, आणखी 2 हजार 990 संशयितांचे अहवाल येणे बाकी आहे. तर 13 कोरोनाग्रस्तांचा आपला जीव गमवावा लागला आहे.

दिवसभरात 1 हजार 623 संशयितांचे नमुन्यांपैकी 306 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह

जालना तालुका -63

मंठा तालुका -18

परतुर तालुका -33

घनसावंगी -26

अंबड -41

बदनापूर -13

जाफराबाद -56

भोकरदन -39

इतर -17 असे एकूण 306 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत.

अद्याप 2 हजार 990 संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे. जिल्ह्याच्या विविध कोविड रुग्णालयातून आज 704 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तेरा रुग्णांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू पावलेल्यांची संख्या 2 तर खासगी रुग्णालयात 11, अशा एकूण 13 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा -जालना : बदनापूर तालुक्यात लसींचा तुटवडा; लसीकरण केंद्रही बंद

ABOUT THE AUTHOR

...view details