जालना - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून विरोधकांनी ( opposition ) टिका करणे सुरू केले असले तरी आमदार रोहित पवारांनी ( MLA Rohit Pawar ) मात्र आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. निमंत्रण आल्यास मीही आदित्य ठाकरेंसोबत आयोध्या दौऱ्यावर जाईल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केले जातेय - काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट केले जात असून हे आम्हाला नाही तर राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केले जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून मुंबई महापालिकेची निवडणूक ( BMC Election ) आयोग डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचे रोहित पवारांनी ( MLA Rohit Pawar ) म्हटले आहे.