जालना - बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकी भाजप सेना युतीचे नारायण कुचे यांनी आघडीचे उमेदवार बबलू चौधरी यांचा १८ हजार ६१२ मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा विजय मिळ।वला आहे. विजयी झाल्यानंतर हा विकासाचा विजय असून बदनापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न येत्या पाच वर्षात सोडवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
बदनापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न पाच वर्षात सोडवणार - नारायण कुचे - narayan kuche
लोक भावनिक मुद्द्याला साथ देत नसून विकास कामाला मत देतात. त्यामुळे आगामी काळात मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सिंचन, रस्ते आणि बेरोजगारी याला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -इसिसविरूद्ध अमेरिकेची मोठी कारवाई, अल बगदादीचा खात्मा?
कुचे म्हणाले, की जनता विकासाच्या पाठीमागे असून आगामी काळात बदनापूर येथे एमआयडीसी उभारून रोजगाराचा प्रश्न सोडवणार आहे. सर्वात आधी बदनापूर शहरात बस स्थानक उभारणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. लोक भावनिक मुद्द्याला साथ देत नसून विकास कामाला मत देतात. त्यामुळे आगामी काळात मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सिंचन, रस्ते आणि बेरोजगारी याला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.