महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार गोरंट्याल यांचे जालन्यात आंदोलन, शिवाजी महाराजांचे एकेरी नाव असलेल्या पाट्यांवर चिकटवले स्टिकर - कैलास गोरंट्याल स्टिकर आंदोलन जालना

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 'स्टिकर आंदोलन' केले. शिवाजी चौक असा एकेरी उल्लेख असलेल्या शासकीय कार्यालयाच्या बोर्डावर 'छत्रपती शिवाजी महाराज चौक' असा उल्लेख असलेले स्टिकर चिटकवून गांधीगिरी मार्गाने आंदोलन ( MLA Kailas Gorantyal sticker agitation Jalna ) करण्यात आले.

MLA Kailas Gorantyal sticker agitation Jalna
कैलास गोरंट्याल स्टिकर आंदोलन जालना

By

Published : Feb 21, 2022, 5:56 PM IST

जालना -काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 'स्टिकर आंदोलन' केले. शिवाजी चौक असा एकेरी उल्लेख असलेल्या शासकीय कार्यालयाच्या बोर्डावर 'छत्रपती शिवाजी महाराज चौक' असा उल्लेख असलेले स्टिकर चिटकवून गांधीगिरी मार्गाने आंदोलन ( MLA Kailas Gorantyal sticker agitation Jalna ) करण्यात आले.

माहिती देताना काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल

हेही वाचा -Jalna BJP Protest : जालना- नांदेड महामार्गावर चक्काजाम, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी भाजप आक्रमक

जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यानी गांधीगिरी करत आजपासून स्टिकर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शासकीय कार्यालये आणि दुकानांच्या बोर्डवर छत्रपती शिवाजी चौक असा उल्लेख होता. या बोर्डवर 'छत्रपती शिवाजी महाराज चौक'असा उल्लेख असलेले स्टिकर चिटकवण्यात येऊन, हे आंदोलन करण्यात आले. मुख्य पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, हॉटेल, चहाची दुकाने, वडा पाव सेंटरच्या बोर्डांवर देखील 'छत्रपती शिवाजी महाराज चौक'असा उल्लेख केलेले स्टिकर आंदोलकांकडून चिटकवण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शासकीय कार्यालयांनी शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख असलेल्या बोर्डावर छत्रपती शिवाजी महाराज चौक, असा उल्लेख करून घ्यावा, अन्यथा आणखी आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला.

हेही वाचा -Rajesh Tope on Corona : मार्चच्या मध्यापर्यंत तिसरी लाट ओसरेल; आरोग्यमंत्र्यांना विश्वास

ABOUT THE AUTHOR

...view details