जालना -तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उद्या मतदान प्रक्रिया होऊ घातली आहे. यावेळी जालना लोकसभा मतदारसंघात ६५ टक्के मतदान होणार असल्याचे भाकीत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी वर्तवले आहे.
जालना लोकसभा मतदारसंघात होणार ६५ टक्के मतदान, आमदार गोरंट्याल यांचे भाकीत
जीएसटी आणि नोटाबंदीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. तसेच सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा सेनेचे कार्यकर्ते मतदान पेटीतून व्यक्त करणार असल्याचेही आमदार गोरंट्याल म्हणाले.
जालना शहरातून होणाऱ्या एकूण मतदानापैकी 65 टक्के मतदान हे काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे यांना, ३० टक्के मतदान भाजप-सेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना, तर ५ टक्के मतदान वंचित बहुजन आघाडी यांना मिळण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
जालना शहरातून आत्तापर्यंत खासदार दानवे यांच्यासोबत व्यापारी, उद्योगपती होते. जालना औद्योगिक वसाहतीमधील स्टील इंडस्ट्रीदेखील त्यांच्यासोबत होती. मात्र, जीएसटी आणि नोटाबंदीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. तसेच सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा सेनेचे कार्यकर्ते मतदान पेटीतून व्यक्त करणार असल्याचेही आमदार गोरंट्याल म्हणाले.