महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 14, 2019, 10:48 AM IST

ETV Bharat / state

लिंगेवाडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला पाण्यात तरंगताना

भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील हरवलेले संतोष मोतीराम साबळे (वय ३५) यांचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले.

संतोष मोतीराम साबळे

जालना- भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील बेपत्ता झालेले संतोष मोतीराम साबळे (वय ३५) यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे.. संतोष साबळे हे सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या कुटुंबाच्या लक्षात आले. त्यावेळेस त्यांनी गावात चर्चा केली असता गावातील तरुणांनी सोशल मीडियाद्वारे हरवला आहे, असे मॅसेज टाकले व त्यांची शोधाशोध केली.

हेही वाचा -महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण

त्यानंतर बुधवारी गावातील के.टी वेअरमध्ये त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

या बाबतची माहिती तत्काळ पोलीस व महसूल विभागाला देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या तलाठी वाघ आणि बिट जमादार भोपळे यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले असून शोकाकूळ वातावरणात बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details