जालना : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत ( Maharashtra Corona Cases Increased ) आहे. यामध्ये अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांनाही कोरोनाची लागण झाली ( Maharashtra Minister Mla Positive ) आहे. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची ( Minister Raosaheb Danve Corona Positive ) लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.
आपल्या फेसबुक अकाऊंट वरुन रावसाहेब दानवे यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, "कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने माझी कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे. तसेच, माझ्या संपर्कांत आलेल्यांनी स्वत:ची तात्काळ टेस्ट करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे."