जालना- भोकरदन तालुक्यात ठिकठिकाणी सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिक मतदान करत आहेत. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. भोकरदन शहरातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन त्यांनी सहकुटुंब मतदान केले.
रावसाहेब दानवेंनी सहकुटुंब केले मतदान हेही वाचा -राज्यभरात 'या' ठिकाणी झालेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन मतदारसंघातून भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. प्रत्येक निवडणुकीत रावसाहेब दानवे हे सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान करतात.
हेही वाचा -मतदान करण्याचे शर्मिला ठाकरेंचे आवाहन; ठाकरे कुटुंबीयांनी केले मतदान
दरम्यान, राज्यात महायुतीसाठी चांगलं वातावरण असून 225 जागांवर महायुती विजयी होईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. तर, यावेळी देखील भोकरदन मतदारसंघातून विकासाच्या बळावर आपण विजयी होऊ, असा विश्वास संतोष दानवे यांनी व्यक्त केला.