जालना -एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Dy CM Ajit Pawar ) यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांच्याशी चर्चा करणार आहे. आता एसटी चालवण्यासाठी बाहेरुन कर्मचारी बोलवावे लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त ताणू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope to ST Workers ) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले.
जालना जिल्ह्यातील संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर टोपे यांनी हे आवाहन केलं. याआधी देखील परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त न ताणता चर्चेने मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी देखील या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाईल असं आश्वासन देखील टोपे यांनी दिलं.
महामंडळाचे तब्बल 1, 600 कोटी रुपयांचे नुकसान -