जालना -सावित्रीमाई फुले स्मृती ज्योती समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त स्मृती ज्योत यात्रा काढली जाते. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थान असलेल्या नायगाव गावापर्यंत स्मृती ज्योत आणली जाते. या स्मृती ज्योतीचे रविवारी जालन्यातील बदनापूर येथे स्वागत करण्यात आले.
'सिंदखेडराजा ते नायगाव' स्मृती ज्योतीचे बदनापुरात जोरदार स्वागत हेही वाचा..."मिलिंद एकबोटेंना वढू गावात जाण्यास बंदी घालावी"
दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त (8 मार्च) बुलडाण्या जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथपर्यंत 'स्मृती ज्योती यात्रा' काढण्यात येते. सिंदखेडराजा येथील दीपक ठाकरे हे या यात्रेचे आयोजन करतात. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे सावित्री सृष्टी निर्माण कार्यासाठी ते या यात्रेचे आयोजन करतात.
नायगाव येथे सावित्री सृष्टी उभारून तेथील परिसराला पर्यटनाचा 'अ' दर्जा देता यावा, त्याठिकाणी ग्रंथालय असावे, ज्यात सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांच्या साहित्यासोबतच इतर अनेक उच्च दर्जाचे साहित्य असेल. जैवविविधता असलेली बाग निर्माण करावी, आदी उद्देशाने ही यात्रा काढण्यात येते.
'सिंदखेडराजा ते नायगाव' स्मृती ज्योतीचे बदनापुरात जोरदार स्वागत सिंदखेडराजा येथून या यात्रेचे प्रस्थान झाले. रविवारी पहिल्याच दिवशी कन्हैय्यानगर, गांधी चमन, जालना, चंदनझिरा, सेलगावमार्गे या ज्योती बदनापूर शहरात आगमन झाले. त्यावेळी गावकऱ्यांनी या ज्योतीचे स्वागत करून पूजन केले.
हेही वाचा...जागतिक महिला दिन : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टि्वटर खाते सांभाळतायत 'या' 7 महिला
बदनापूर शहराप्रमाणेच तालुक्यातील सेलगाव येथेही ज्योतीचे स्वागत करण्यात आले.