जालना -युक्रेनमध्ये एम.बी.बी.एस.च्या शिक्षणासाठी गेलेला किरण भंडारी नावाचा विद्यार्थी जालन्यात परतला. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध भडकल्याने किरणचे आई - वडील चिंतेत होते. अखेर आज किरण घरी परतल्याने त्याच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -Video : जालना जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; भारतात घेऊन जाण्याची मागणी
किरण घरी परत येताच त्याच्या आईने त्यांचे औक्षण करून त्याचे स्वागत केले. मूळचे नेपाळचे असलेले भंडारी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून जालन्यात वास्तव्यास आहे. किरणचे वडील जालना शहरात गोरखा म्हणून रात्री गस्त घालतात. एका महाविद्यालयाच्या प्रांगणात पत्राचे शेड करून हे कुटुंब वास्तव्यास आहे. गरिबीची परिस्थिती असतानाही भंडारी दाम्पत्याने किरणचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला युक्रेनला पाठवले होत. मात्र, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध भडकल्याने भारत सरकारने किरणला भारतात येण्यासाठी मदत करावी, अशी मागणी किरणच्या आई वडिलांनी केली होती.