महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात आणखी एका उद्योजकांच्या हत्येच्या सुपारीच्या कट उघडकीस

मुनोत हत्या करण्याचा कट रचणाऱ्या राजेश नहार याच्यासह पाच जणांना गुन्हे शाखेने आज न्यायालयात हजर केले असता, त्यांची 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

jalna police
जालना पोलीस

By

Published : Dec 6, 2019, 8:08 PM IST

जालना- येथील आणखी एका उद्योजकाची हत्या करण्यासाठी सुपारी देऊन कट रचल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परतूरचा सुपारीकिंग राजेश नहार याच्यासह पाच जणांना अटक केली आहे.

हेही वाचा -चेन्नईच्या रेल्वे कारखान्यातून मध्य रेल्वेच्या ताफ्यात एसी लोकल दाखल

जालना येथील विमलराज सिंघवी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राजेश नहार व पाच जणांना मागील महिन्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी अटक केली होती.

सिंघवी प्रकरणात तपास करत असताना गुन्हे शाखेच्या हाती काही रेकॉर्डिंगसह धागेदोरे लागले होते. त्यानंतर 22 जुलैच्या रात्री जालन्यातील उद्योजक गौतम मुनोत यांच्या घरावर दरोडा पडला होता. मात्र, तपासात हा दरोड्याचा बनाव असून तो मुनोत यांची हत्या करण्यासाठी सुपारी देऊन रचलेला कट होता, असे पोलीस अधिकारी गौर यांनी तपासात निष्पन्न केले.

गौतम यांची आर्थिक व्यवहारातून मोठी सुपारी देऊन हत्या करण्याचा कट राजेश नहार यानेच रचल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सिंघवी यांच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या राजेश नहार याला रात्री गुन्हे शाखेने जेरबंद केले. तसेच, सिंघवी प्रकरणात एमसीआर झालेल्या सोमनाथ गायकवाड, दत्ता जाधव या दोघांनाही पुन्हा अटक केली असून याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुनोत हत्या करण्याचा कट रचणाऱ्या राजेश नहार याच्यासह पाच जणांना गुन्हे शाखेने आज न्यायालयात हजर केले असता, त्यांची 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details