महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुतात्मा जवान गणेश गावंडेंवर भिवपुर येथे शासकीय इतमामात करण्यात येणार अंत्यसंस्कार, गावकऱ्यांच्या वतीने तयारी अंतिम टप्प्यात - News about martyr Jawan Ganesh Gawande

जालना जिल्ह्यातील भोकरदनचे जवान गणेश गावंडे यांच्यावर भिवपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गावातील तरुण अंत्यसंस्काराच्या तयारी लागेल आहेत.

Martyr Jawan Rajesh Gawande will be cremated at Bhivpuri in a state funeral
हुतात्मा जवान गणेश गावंडेंवर भिवपुर येथे शासकीय इतमामात करण्यात येणार अंत्यसंस्कार, गावकऱ्यांच्या वतीने तयारी अंतिम टप्प्यात

By

Published : Dec 22, 2020, 7:56 PM IST

जालना (भोकरदन) - भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील भारतीय सैन्य दलातील जवान गणेश संतोष गावंडे (वय ३८) हे पुणे येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले आहे. त्यांना सोमवारी दि.२१ डिसेंबरला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील भिवपूर येथील जवान गणेश गावंडे हे पंधरा वर्षांपासून भारतीय सैन्यदलात मराठा बटालियन इन्फंट्रीमध्ये सेवा बजावत होते. मात्र, अवघ्या चार दिवसांपूर्वीच त्यांची बदली इतर ठिकाणाहून पुणे येथे मराठा बटालियन रेस कोर्स पुणे येथे झाली होती. त्या ठिकाणी ते सेवा बजावत असताना सोमवारी चौथ्या दिवशी सकाळी सहाच्या दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच भिवपुर गावासह तालुक्यात मोठी शोककळा पसरली. बुधवारी (ता.२३) सकाळी नऊ वाजता त्यांच्या मूळगावी भिवपुर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हुतात्मा जवान गणेश गावंडेंवर भिवपुर येथे शासकीय इतमामात करण्यात येणार अंत्यसंस्कार, गावकऱ्यांच्या वतीने तयारी अंतिम टप्प्यात

शहीद जवान यांच्या विषयी गावकऱ्यांनी केल्या भावना व्यक्त -

गणेश गावंडे यांचे देश सेवा करण्याचे स्वप्न होते आणि ते त्यांनी साकार करून देशाची सेवा करत होते. ते तरुणांना देश सेवा करण्याचे प्रेरणा व त्यासाठी योग्य मार्गदर्शन करत असत. सामाजिक, धार्मिक कामात त्यांचा मोठा सहभाग असायचा, असे यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना गावातील नागरिक म्हणाले.

हुतात्मा जवान गणेश गावंडेंवर भिवपुर येथे शासकीय इतमामात करण्यात येणार अंत्यसंस्कार, गावकऱ्यांच्या वतीने तयारी अंतिम टप्प्यात

सर्व गावातील तरुण लागले अंत्यसंस्काराच्या तयारीला -

अपल्या गावाचा जवान कर्तव्य बजावताना शहीद झाला असल्याने गावातील तरुण अंत्यसंस्काराच्या तयारी लागेल आहेत. पोलिस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, गणेश निकम हे या ठिकाणी नियोजन करण्यासाठी हजर होते. मात्र, तहसीलदार कार्यालय यांचे अधिकारी फिरकले नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

हुतात्मा जवान गणेश गावंडेंवर भिवपुर येथे शासकीय इतमामात करण्यात येणार अंत्यसंस्कार, गावकऱ्यांच्या वतीने तयारी अंतिम टप्प्यात

ABOUT THE AUTHOR

...view details