महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विवाहितेचा मृतदेह दवाखान्यातच सोडून सासरच्यांनी केला पोबारा, जालन्यातील अन्वी येथील घटना

जालन्यात एका विवाहित महिला आणि तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. संध्याकाळी त्या दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, त्यांचे मृतदेह तसेच सोडून तिच्या सासरच्या मंडळींनी पोबारा केला.

Married woman died due to fall into well in Anvi village at Badnapur
बदनापूर तालुक्यातील अन्वी गावात विवाहितेचा मुलासहीत विहिरीत पडुन मृत्यू

By

Published : Dec 31, 2019, 10:28 PM IST

जालना -बदनापूर तालुक्यातील अन्वी या गावात एका विवाहित महिला आणि तिच्या मुलाचा विहिरीत पडुन संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. संध्याकाळी विवाहित महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, त्यांचे मृतदेह तसेच सोडून सासरच्या मंडळींनी पोबारा केला. शेवटी विवाहितेच्या माहेरच्या माणसांनीच त्यांचे मृतदेह माहेरी असोला (सिंदखेड राजा तालुका) येथे नेत, त्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी तिच्या माहेरच्या माणसांनी सासरकडील लोकांनीच तिला विहिरीत ढकलल्याचा आरोप केला आहे.

बदनापूर तालुक्यातील अन्वी गावात विवाहितेचा मुलासहीत विहिरीत पडुन मृत्यू, माहेरच्या लोकांनी केला सासरकडील लोकांवर खुनाचा आरोप

हेही वाचा... नाराज आमदारांना बरोबर घेऊन काम करणार; काँग्रेस मंत्र्यांनी घेतली राहुल, सोनिया यांची दिल्लीत भेट

सिंदखेड राजा तालुक्यातील असोला गावच्या मुलीचा विवाह पाच वर्षांपूर्वी बदनापूर तालुक्यातील अन्वी गावातील मुलासोबत झाला होता. नानासाहेब ढाकणे असे त्या मुलाचे नाव आहे. लग्नापासूनच सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करून विविध प्रकारच्या मागण्या केल्या होत्या. त्यातून विवाहित महिला आणि सासरच्यांमध्ये वारंवार भांडणे होत होती. सोमवारी देखील अशाच प्रकारच्या भांडणातून सासरच्यांनी विवाहितेला विहिरीत ढकलून दिले, असे विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

हेही वाचा... सलग चौथ्या महिन्यात पायाभूत क्षेत्राच्या उत्पादनात घसरण

ही घटना घडली त्या दिवशी, घरात भांडण सुरू झाल्यानंतर सासरच्यांनी विवाहितेच्या माहेरी फोन करून सांगितले. त्यावेळी नेहमीचीच भांडणे असावीत, असा विचार करून माहेरच्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, पुन्हा एकदा फोन आल्याने यावेळी मात्र तिच्या घरच्यांनी काहीतरी गडबड असल्याचा विचार करत अन्वी गाव गाठले.

हेही वाचा... अमूलची सोशल मीडियावरून बदनामी; आरोपीने 'ही' मागणी करताच गुन्हा दाखल

माहेरच्यांनी मुलीच्या घरी जाऊन तिची चौकशी केली असता, सासरच्यांनी ती शेतात गेली असल्याचे सांगितले. परंतु अधिक विचारपूस केल्यानंतर विहिरीत जाऊन बघा, तिथे असेल असे उत्तर मिळाले. त्यावेळी प्रत्यक्ष विहिरीत जाऊन पाहिल्यानंतर विवाहित महिला आणि तिचा दीड वर्षांचा मुलगा दोघेही पाण्यावर तरंगताना आढळले. पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जालना येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. मात्र, सासरच्या मंडळींनी रुग्णवाहिका दवाखान्यात पोहचल्यानंतर तिथून पळ काढला.

हेही वाचा... खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

शेवटी माहेरच्या मंडळींनीच रूग्णालयातील सर्व सोपस्कार पार पाडले. परंतु, जोपर्यंत सासरच्या माणसांवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी विवाहितेच्या सासरकडील मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला. अखेर माहेरच्या मंडळींनी विवाहितेचा मृतदेह ताब्यात घेत, असोला (सिंदखेड राजा तालुका) येथे नेऊन विवाहिता आणि तिच्या मुलावर माहेरीच अंत्यसंस्कार केले.

ABOUT THE AUTHOR

...view details