महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती ढासळली

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बुधवारी सकाळी ढासळली. ते २९ ऑगस्टपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणावर आहेत.

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 9:31 AM IST

Updated : Sep 6, 2023, 11:22 AM IST

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील

अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना

जालना Maratha Reservation Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बुधवारी सकाळी ढासळली. त्यांना अशक्तपणा जाणवत असून बोलण्यासही त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांना सध्या सलाईन लावण्यात आलंय. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपोषणस्थळीच उपचार सुरू आहेत.

२९ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केलं : मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाकरता जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं. तेव्हा त्यांच्या या उपोषणाची माध्यमं किंवा प्रशासनानं फारशी दखल घेतली नाही. मात्र एक १ सप्टेंबर रोजी पोलिसांकडून तेथील आंदोलकांवर लाठीहल्ला झाला. यामध्ये अनेक आंदोलक तसेच पोलीसही जखमी झाले. त्यानंतर मनोज जरांगे यांचं हे आंदोलन राज्यभरात पोहचलं.

राज्य सरकारला ४ दिवसांचा अल्टीमेटम : विरोधकांनी प्रशासनाच्या या कृत्याचा निषेध करत झालेला प्रकार अत्यंत अमानुष असल्याचा आरोप सरकारवर केलाय. मनोज जरांगे पाटलांनी मंगळवारी राज्य सरकारला ४ दिवसांचा अल्टीमेटम दिला. आरक्षणावर सरकारनं चार दिवसात निर्णय घेतला नाही तर, अन्नासह पाण्याचाही त्याग करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.

हेही वाचा :Curfew In Jalna District: जालन्यात 17 सप्टेबरपर्यंत जमावबंदी, नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे लवकरच आंदोलकांची घेणार भेट

कोण आहेत जरांगे पाटील : या संपूर्ण आंदोलनादरम्यान, मराठा आरक्षणासाठी गेल्या कित्येक वर्षापासून शासन दरबारी लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील अख्या महाराष्ट्राला कळाले. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या जरांगे पाटलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढले आहेत. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या जरांगे पाटलांनी मिळेल ते काम करत आपल्या संसाराचा गाडा हाकला. ते मुळचे बीड जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील मातोरी गावचे. मात्र नंतर ते जालन्यातल्या अंबड तालुक्यातील अंकुश नगर इथं आले. त्यांना पत्नी, चार मुले, तीन भाऊ आणि आई-वडील असा मोठा परिवार आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी त्यांच्या चार एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन विकली आहे.

जालना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते : जरांगे पाटील हे आधी जालना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र २००३ ला जेम्स लेन प्रकरणाचा वाद पेटल्यानंतर त्यांचे पक्षाशी मतभेद झाले. त्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. जरांगे पाटलांनी २०११ मध्ये शिवबा संघटनेची स्थापना केली. त्यांनी मराठवाड्यात या संघटनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आंदोलनं करत अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय.

हेही वाचा :Raj Thackeray Met Maratha Protestors : लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाड्यात पाय ठेऊ देऊ नका; राज ठाकरे आक्रमक

Last Updated : Sep 6, 2023, 11:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details