महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maratha Reservation : संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; उपोषण मागं घेण्याची विनंती - sambhaji bhide in jalna

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. जरांगे पाटील यांचे उपोषण आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री बंगल्यावर सर्वपक्षीय बैठक झाली. त्यानंतर आता आज पुन्हा सरकारमधील मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ अंतरवाली गावात येऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 10:14 AM IST

Updated : Sep 12, 2023, 12:10 PM IST

संभाजी भिडेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट

जालना : Maratha Reservation :मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घ्यावं याबाबतचा ठराव या सर्वपक्षीय बैठकीत मंजूर करण्यात आलाय. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांनी अंतरवालीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत, उपोषण मागं घेण्याची विनंती केली. तसंच मी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचंही (Sambhaji Bhide Met Manoj Jarange) भिडे यावेळी म्हणाले.

सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीत : सोमवारी मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक झाली. याबैठकीत मराठा आंदोलनासंदर्भात काही निर्णय घेण्यात आले. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जु खोतकर यांनी जरांगे यांची भेट घेत चर्चा केली. तसेच उपोषण मागं घेण्याची विनंतीही करण्यात आली.

संभाजी भिडेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट :शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अंतरवालीत जाऊन उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकरही सोबत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. हा लढा सुरू ठेवा पण हे उपोषण थांबवा, अशी विनंती संभाजी भिडे यांनी जरांगे यांना केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे : मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल मी विश्वासानं शब्द देतो की मनोज जरांगे यांना पाहिजे ते दिलं जाणार. त्यामुळं जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागं घ्यावं, लवकरात लवकर या आंदोलनाला यश येणार आहे. तुमची भूमिका 101 टक्के योग्यच आहे. या आंदोलनाचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत होणार नाही. त्यामुळं आम्ही तुमच्यासोबतच आहोत, अशी गवाही संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली. तसेच संभाजी भिडे यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे कौतुकही केलं.

उपोषण मागे घेण्याची भिडेंची विनंती :मराठा आरक्षणाचा लढा कायम ठेवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करू, त्या सर्वच प्रयत्नांचा आताच निकाल येणार नाही पण, जसे चालत राहू तसे त्याचे रूप प्रगट होईल. मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांच्याच नेतृत्वाखाली चालावे हे माझे वैयक्तिक मत आहे. ते करत असलेले प्रयत्न उत्तम असून, माघारी येऊ नयेत. तसेच युद्धातील डावपेच म्हणून उपोषण थांबवलं पाहिजे, असे भिडे म्हणाले.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घ्यावं; सर्वपक्षीय बैठकीत एकमतानं ठराव मंजूर
  2. Maratha Protest: आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक; छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको, तर १७ सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास...
  3. Maratha Reservation : सरकारनं दीड वर्षात मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली का नाही?
Last Updated : Sep 12, 2023, 12:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details