जालना Maratha Reservation Issue :यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरकार मराठा आरक्षण द्यायच्या ऐवजी नाटकं करत आहे. सरकारने ते न करता नोंदी मागण्याची अट सोडून समाजाला सरसकट आरक्षण द्यावे. नोंदी सापडल्या नाहीत तर आरक्षण देणार नाही का? असाही प्रश्न जरांगे यांनी विचारला.
शासनाला 14 तारखेपर्यंतचा वेळ दिला :या अगोदर ज्या-ज्या समाजाला आरक्षण देशभरात देण्यात आले आहे त्यामध्ये असल्या कुठल्या समाजाच्या नोंदी यापूर्वी सरकारने घेतल्या आहेत का, ते सुद्धा सरकारने स्पष्ट करावे. मराठा समाजाला कुणबी असल्याच्या नोंदी मागाव्या. तसेच आम्ही सरकारला 14 तारखेपर्यंत कुठलाच त्रास देणार नाही. 14 तारखेच्या नंतर राज्यभरात समाज आपापल्या परीने काय करायचे ते करणार आहे. कारण महाराष्ट्रातील मराठ्यांना सरकारला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावचं लागणार आहे. सरकारने मराठा समाजाकडून 40 दिवसांचा वेळ हा स्वतःहून मागून घेतलेला आहे. हा वेळ आम्ही सरकारला दिलेला नाही तर सरकारने आमच्याकडून घेतला आहे. त्यामुळे सरकारने योग्य तो निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, तसंच मराठा प्रवर्गाला 50 टक्क्यांच्या आत जर सरकार आरक्षण देत असेल तर ते आम्ही घ्यायला तयार आहोत. पण 50% च्या वरती मराठा प्रवर्ग तयार करून जर आरक्षण देत असेल तेथे खोटं आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही, असा इशारा सुद्धा यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.