डॉ. संजय लाखे पाटील यांची प्रतिक्रिया जालनाMaratha Reservation : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवाली सराटी लाठीचार्जची खरी माहिती लपवून सभागृहाची राज्याची दिशाभूल केली आहे. त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना ईमेल पाठवला आहे.
"अंतरवाली सराटीत ग्रामस्थांवर झालेल्या अमानुष गोळीबाराची निष्पक्ष चौकशी करावी. तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी असा ईमेल विधानसभा अध्यक्षांना पाठावला आहे. तसंच या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाकडं तक्रार केलीय."- डॉ. संजय लाखे, मराठा क्रांती मोर्चा
फडणवीस सवयीप्रमाणं खोटं बोलले : अंतरवाली सराटीत ग्रामस्थांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्काभंगाची कारवाई करण्याची मागणी मराठा राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे यांनी केली आहे. तसंच त्यांनी या प्रकरणी लोकायुक्त, राज्य मानवी हक्क आयोगाकडंही तक्रार दाखल केली आहे. अंतरवाली सराटी संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात दिलेली माहिती खोटी, दिशाभूल करणारी आहे. सभागृहासह राज्यातील नागरिकांची फडणवीसांनी दिशाभूल केली आहे. फडणवीस सवयी प्रमाणं सभागृहात खोटं बोलल्याचा आरोप लाखे यांनी केला आहे.
नागरिकांना न्याय मिळायला हवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लाखे पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून नागरिकांना न्याय मिळायला हवा, असं देखील ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपवण्यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, असा आग्रह मी धरला होता. माझ्या भूमिकेला छगन भुजबळ यांच्यासह दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी एकमतानं पाठिंबा दिल्याचं लाखे पाटील यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानीकडून वसंतदादा कारखान्यासमोर जोरदार राडा
- भाजपा हा पक्ष नसून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, खा. संजय राऊतांचा हल्लाबोल
- भिडे वाड्याच्या जागेवर उभी राहणार शाळा; छगन भुजबळ यांची माहिती