जालना -मंठा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय मधुकरराव पाटील यांच्याविरुध्द निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाचे अव्वर सचिव स.ह.धुरी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कार्यालयात वारंवार अनुपस्थित राहणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला गैरहजर राहणे, कार्यालयात मद्यप्राशन करून येणे इत्यादी गंभीर बाबी निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
मंठ्याचे गटविकास अधिकारी निलंबित; राज्य सरकारची कारवाई - मंठा पंचायत समिती
वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कार्यालयात वारंवार अनुपस्थित राहणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला गैरहजर राहणे, कार्यालयात मद्यप्राशन करून येणे इत्यादी गंभीर बाबी निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
गटविकास अधिकारी संजय पाटील यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत पाटील यांच्याविरुध्द तडकाफडकी निलंबनाची कारवाई करून त्याबाबतचे आदेश मंगळवार दि.5 रोजी सायंकाळी उशिरा निर्गमित केले आहेत.