मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया जालनाManoj Jarange Patil News : उपोषणाच्या 14 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांवर कायम आहेत. त्यांनी आजपासून पाण्याचा देखील त्याग केलाय. त्यांनी आज महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन केल्यानं त्यांचं आंदोलन अधिक तीव्र झालंय. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहा. जरांगे पाटलांची प्रकृती खालावत आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलंय की, फक्त आता मराठा आरक्षणच हाच एकमेव उपाय आहे.
जरांगेंची प्रकृती ढासाळली :मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात बेमुदत उपोषणाला बसलेय. त्यांचं वय 40 वर्ष आहे. एका आरोग्य अधिकाऱ्यानं माध्यमांना सांगितलंय की, आमचे डॉक्टरांचे पथक रविवारी संध्याकाळी जरांगे यांना भेटायला गेलं होतं. परंतु त्यांनी स्वतःची तपासणी करण्यास नकार दिला. त्यांनी (Manoj Jarange stops fluids intake) द्रवपदार्थ देखील घेणं बंद केलंय, असं जालन्याचे सिव्हिल सर्जन प्रताप घोडके म्हणाले.
मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ :जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil News Maratha protest) आज माध्यमांशी बोलताना, महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलंय. मराठा समाजाने गेल्या 70 वर्षातील सर्व राजकीय पक्षांची काळजी घेतली आहे. आता मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आहे. कोणता पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील, हे समाज पाहील, असंही ते म्हणालेत. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे अधिकृत शिष्टमंडळ आल्यास कोटा समर्थक ऐकण्यास तयार आहेत. आम्ही त्यांना पुरेसा वेळ दिलाय. ते मागण्या ऐकायला तयार असतील तर आम्ही नक्कीच त्यांचे म्हणणे ऐकू, असे त्यांनी सांगितलंय.
मराठा आरक्षण हाच माझा उपचार :आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी सांगितलंय. माझा कुणाला त्रास नाही, असंही ते म्हणाले. काही लोकं फक्त चर्चा करण्यासाठी येतात आणि निघून येतात. जे येतात त्यांच्यासोबत चर्चा केली जातेय. त्या लोकांना फक्त समाजाला दाखवायचे असते की, आम्ही दखल घेत आहोत, पण ते आमचं ऐकंत नाही. आरक्षण द्या लगेच ऐकतो, असंही जरांगे म्हणालेत.
हेही वाचा :
- Maratha Reservation : आईच्या भेटीनं जरांगे पाटलांना अश्रू अनावर
- kunbi certificate GR : कुणबी प्रमाणपत्राचा राज्य सरकारनं काढला अध्यादेश, मनोज जरांगे अजूनही उपोषणावर ठाम, कारण...
- Maratha Reservation : जरांगे पाटलांनी आंदोलन मागं घ्यावं, सरकारची शिष्टमंडळाकडं विनंती