महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Manoj Jarange Patil News : उपोषणाचा चौथा दिवस; जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.

Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil News

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 9:49 AM IST

जालना Manoj Jarange Patil News : जालन्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय. आता आरक्षण हेच माझ्यावर इलाज असल्याचं त्यानी सांगितलंय. यामुळं सरकार पुढं आता नवीन पेच निर्माण झालाय.

पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार : मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलंय. बुधवारपासून जालन्यातील आंतरवाली सराटी इथं जरांगेंचं उपोषण सुरू असून, उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी पाण्याचा थेंबही घेतला नाही. विशेष म्हणजे उपचारासाठी आलेल्या वैद्यकीय पथकालाही त्यांनी परत पाठवत, उपचार घेण्यास नकार दिलाय. त्यामुळं जरांगे पाटलांची प्रकृती खालावत असल्याचं पाहायला मिळतंय.

तर मोदींचं विमानंही उतरु दिलं नसतं : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी इथं झालेल्या सभेत मराठा आरक्षणावर काहीच बोलले नाहीत. त्यामुळं त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांना सांगण्यात आला नसेल, किंवा सांगूनही त्यांनी यावर बोलणं टाळलंय. त्यामुळं पंतप्रधान मोदींना गोरगरीबांची गरज नाही. त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल बोललं नाही, तरी मराठ्यांना काहीच फरक पडत नाही. जर मराठ्यांनी विचार केला असता, तर पंतप्रधान मोदींचं विमानही उतरु दिलं नसतं, असंही जरांगे पाटील म्हणाले होते.

अनेक गावांत नेत्यांना गावबंदी :मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. तसंच आरक्षणासाठी संपुर्ण मराठा समाज आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढारी आणि नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचं पहायला मिळतंय. तसंच आतापर्यंत अनेक मंत्री, आमदार, खासदार यांचा ताफा अडवल्याचं पहायला मिळतंय.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation Row : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी; उपोषणाला परवानगी नाकारली
  2. Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री शिंदेंना घरचा आहेर, ठाणे जिल्हा प्रमुख म्हणाले ....'असे' मराठा मुख्यमंत्री नकोच
  3. Maratha Reservation Row : मराठा आंदोलनाचा कृषीमंत्री धनंजय मुंडेंना फटका ? ; पुण्यातील कार्यक्रमाकडं फिरवली पाठ, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details