महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; सरकारला शेवटचा इशारा

Manoj Jarange On Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. राज्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाने 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा तीव्र उपोषण करण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 4:56 PM IST

Updated : Oct 22, 2023, 6:05 PM IST

मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद

जालना : Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारची वेळ संपत चालली आहे. राज्य सरकारनं 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास 25 तारखेपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहे. या उपोषणादरम्यान कोणतेही पाणी, औषध घेतलं जाणार नाही. तसंच कडक उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून द्या. तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ देणार नाही. आरक्षण घेऊनच गावात या - मनोज जरांगे पाटील

साखळी उपोषण : जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला आमच्या गावात येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात या. 25 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील गावांमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर 28 तारखेपासून साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रूपांतर होईल, अशी तयारी मराठा समाजानं केल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. मनोज जरांगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येईपर्यंत आरक्षण दिलं, तर गुलालानं भरलेल्या गाड्या येतील. अन्यथा माणसं भरून गाड्या येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

25 तारखेपासून आमरण उपोषण : राज्य सरकारनं जर 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. रविवारी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांनी गोदा पट्ट्यातील 123 गावांतील मराठा आंदोलकांची बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या उपोषणादरम्यान मी कोणतीही वैद्यकीय सेवा घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत संवैधानिक पदावर बसलेल्या कोणत्याही नेत्याने आमच्या गावात फिरकू नये, असंही त्यांनी म्हटलंय. यायचं असेल तर आरक्षण घेऊनच यावं लागेल, असंही ते म्हणाले.

एकाच ठिकाणी साखळी उपोषण :महाराष्ट्रात प्रत्येक गावांच्या वतीनं एकाच ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. 28 तारखेपासून या साखळी उपोषणाचं रूपांतर आमरण उपोषणात होणार आहे. यासाठी मराठा समाजानं मंडळनिहाय तयारी केली आहे. सर्व गावांनी वर्तुळाच्या ठिकाणी एकत्र यावं, मोठं गाव असल्यास आजूबाजूच्या सर्व गावातील लोकांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी बसावं, असं मनोज जरांगे यांनी सांगितले.

आंदोलनाची नवी दिशा जाहीर : मनोज जरांगे पुढे म्हणाले, प्रत्येक तालुक्‍यात आणि गावात मराठा समाजाने मोठ्या संख्येने एकत्र येऊन सरकारला जागे करण्यासाठी कँडल मार्च काढावा. सरकार हे शांततेत आंदोलन सुरू होऊ देणार नाही. 25 ऑक्टोबरला पुन्हा आंदोलनाची नवी दिशा जाहीर होणार आहे. मात्र, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. महाराष्ट्रातील पाच कोटी मराठा हे आमरण उपोषण आणि साखळी उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने २४ तारखेपर्यंत सोडवावा. 25 तारखेला पुन्हा आंदोलनाची दिशा सांगितली जाणार आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation Protest : एकच मिशन, मराठा आरक्षण.. आरक्षण जालन्यातील 245 गावांत राजकीय पुढाऱ्यांना 'गावबंदी'
  2. Manoj Jarange Patil : चार वर्षांमध्ये ओबीसींची 60 टक्के लोकसंख्या कशी वाढली? मनोज जरांगे पाटलांचा सवाल
  3. Maratha Reservation Protest : 'कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं त्यांनी घ्यावं, अन्यथा...', नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे? वाचा सविस्तर
Last Updated : Oct 22, 2023, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details