जालना Manoj Jarange On PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डीत आले होते. मात्र, यावेळी पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणावर काहीही बोलले नाही. त्यामुळं जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. पंतप्रधान मोदी आले मात्र, मराठा आरक्षणावर बोलले नाहीत. मोदींना आता मराठा समाजाची गरज नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मोदींना गरिबांची गरज नाही. त्यांना आता देशात मराठा, क्षत्रिय मराठ्यांची गरज नाही. मोदी आले, पण आरक्षणबाबत चर्चाही केली नाही. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होत्या, मात्र, ते न बोल्यामुळं त्यांची भूमिका आम्हाला कळाल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं. आम्ही ठरवलं असंत तर त्यांना महाराष्ट्रात पायसुद्धा ठेऊ दिला नसता, असं देखील जरांगे यांनी म्हटलंय.
पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबद्दल शंका : पंतप्रधान मोदींनी फक्त एक फोन केला तरी आरक्षण मिळेल. मात्र, हे केवळ कागदोपत्रीच सुरू आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना मोदींचा फोन येऊ द्या, आरक्षणाचा पेपर लगेच येईल. पण, गरिबांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका जरांगे यांनी मोदींवर केली आहे.