जालना - मुख्यधिकाऱ्याचे नाव पुढे करीत पेन्शन मंजूर करून देण्याचे अमिष दाखवत ३८ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या एका व्यक्तीस लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. हमद अमर अमौदी चाऊस उर्फ साई(५५), असे या आरोपीचे नाव असून भोकरदन येथील नगर परिषद कार्यालयासमोर सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
मुख्यधिकाऱ्याच्या नावावर घेतली ३८ हजाराची लाच; एकाला अटक - जालना भ्रष्टाचार न्युज
भोकरदन शहरातील एका व्यक्तीने प्रोव्हीजन पेन्शन मिळावी म्हणून नगर परिषदकडे पाठपुरावा सुरू केला होता. यावेळी शहरातील साई या व्यक्तीने मुख्यधिकाऱ्याना सांगून काम करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच त्या कामासाठी सुरुवातीला ३२ हजार रूपये घेतले. त्यानंतर कामासाठी३८ हजार रूपयांची मागणी केली.
भोकरदन शहरातील एका व्यक्तीने प्रोव्हीजन पेन्शन मिळावी म्हणून नगर परिषदकडे पाठपुरावा सुरू केला होता. यावेळी शहरातील साई या व्यक्तीने मुख्यधिकाऱ्याना सांगून काम करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच त्या कामासाठी सुरुवातीला ३२ हजार रूपये घेतले. त्यानंतर कामासाठी
३८ हजार रूपयांची मागणी केली. मुख्यधिकाऱ्याचे नाव पुढे करीत चाऊस वारंवार पैसे मागत होता. त्यामुळे संबंधित व्यक्तीने येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर सोमवारी भोकरदन नगर परिषदेसमोर सापळा लावण्यात आला. यावेळी तक्रारदाराच्या कामासाठी पैशाची मागणी करून ३८ हजार रूपये स्वीकारताच पथकाने कारवाई केली. या प्रकरणी हमद चाऊस याच्याविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपाधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एस. शेख, कर्मचारी गणेश चेके, सचिन राऊत, शिवाजी जमधडे, चालक प्रवीण खंदारे यांच्या पथकाने केली. भोकरदन तालुक्यात या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.