जालना - शिक्षणासाठी आजींकडे राहणाऱ्या एका तरूणीच्या ओळखीचा गैरफायदा एका तरुणाने घेतला. तिच्या सोबत काढलेले जुने फोटो त्यांने व्हायरव केले होते. या प्रकरणात कदीम जालना पोलिसांनी आज एका मजनूजी वरात काढली.
असे आहे प्रकरण -
जालना - शिक्षणासाठी आजींकडे राहणाऱ्या एका तरूणीच्या ओळखीचा गैरफायदा एका तरुणाने घेतला. तिच्या सोबत काढलेले जुने फोटो त्यांने व्हायरव केले होते. या प्रकरणात कदीम जालना पोलिसांनी आज एका मजनूजी वरात काढली.
असे आहे प्रकरण -
जालन्यातील साळी गल्ली भागात राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणीच्या वडिलांचा रंग कामाचा व्यवसाय आहे. चिरागोद्दीन कादरी असे त्यांचे नाव असून यांनी त्यांच्या मुलीला घनसांवगी तालुक्यातील रांजणी येथे तिच्या आजीकडे शिक्षणासाठी ठेवले होते. ज्या ठिकाणी ही मुलगी राहत होती त्याच गावात वाजेदखान जलीलखान हा युवक देखील राहत होता. या मुलीच्या वडिलांसोबत रंगकाम देखील करत होता. त्यामुळे या मुलीची आणि वाजेत खानची चांगली ओळख होती. ओळखीचा गैरफायदा घेत वाजेदखान याने मुली सोबत काही फोटो काढले होते. ते फोटो हा वाजेदखान व्हायरल करायचा.
दोनदा लग्न मोडले -
तक्रारदार मुलीच्या वडिलांनी तिच्या साठी लग्नाची दोन स्थळे पाहून ते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाजेतखान पूर्वी काढलेले फोटो व्हायरल करायचा आणि नवरदेवा कडील लोकांना ते पाठवायचा. या प्रकारामुळे मुलीचा सुरत येथे झालेला साखरपुडा देखील मोडला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी वाजत खान याला समजावून सांगितले. पुन्हा एकदा या मुलीचा विवाह चार महिन्यांपूर्वी अंबड येथील शेख सद्दाम शेख शब्बीर याच्यासोबत ठरला होता. लग्नाची तारीख पक्की झाली होती. 21 मार्चला लग्न होणार होते. त्यानुसार पत्रिका देखील छापल्या. त्याच वेळी वाजेदखान जलीलखान याने तरुणीसोबत काढलेले जुने फोटो पुन्हा एकदा नवरदेव शेख सद्दाम शेख शब्बीर यांच्या व्हाट्सअप वर पोस्ट केले. आणि मुली बद्दल अपशब्द वापरले. हे फोटो या नवरदेवाने मुलीच्या बहिणीच्या व्हाट्सअप वर 25 तारखेला पोस्टही केले. दुसरेही लग्न मोडल्यामुळे या मुलीची समाजामध्ये बदनामी सुरू झाली. याला वैतागून मुलीने आज सकाळी सरळ कदीम जालना पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घनसांवगी तालुक्यातील रांजणी येथे राहणाऱ्या गडीमोहल्ल्यातील वाजेदखान जलीलखान या तरुणाला घनसावंगी येथून पकडून गुन्हा दाखलकेला आहे. घनसांवगी येथून पकडून आणण्यासाठी पोलीस दीपक दाभाडे, उमेश साबळे, रामलाल कांगणे,यांचे पथक गेले होते .