जालना - रखरखत्या उन्हामध्ये पाण्याच्या थेंबासाठी तडफडणाऱ्या जीवाला शांत करण्यासाठी फक्त पाणीच नव्हे तर ताकाने तहान भागविण्याचा उपक्रम माहेश्वरी महिला मंडळाने हाती घेतला आहे. समस्त गोसेवा परिवार पांजरपोळ गोशाळा जालना, आणि माहेश्वरी महिला मंडळ यांच्यावतीने हा उपक्रम राबवला जात आहे.
बस स्थाकावर तहानलेल्या प्रवाशांना मोफत ताक वाटप, माहेश्वरी महिला मंडळाचा पुढाकार - Jalna
जालना बस स्थानकात रविवार पासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. ११ तारखेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. रोज १०० लिटर ताक बस स्थानकात आलेल्या आणि तहानलेल्या प्रवाशांना मोफत देण्याचा चंग या महिलांनी बांधला आहे. या उपक्रमा सोबतच विविध उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत.
जालना बस स्थानकात रविवार पासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. ११ तारखेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. रोज १०० लिटर ताक बस स्थानकात आलेल्या आणि तहानलेल्या प्रवाशांना मोफत देण्याचा चंग या महिलांनी बांधला आहे. या उपक्रमासोबतच विविध उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये मंगळवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शहरातील गरीब वस्तीमध्ये जाऊन माठाचे वाटप करण्यात आले. ज्या भागात पाण्याची अत्यंत कठीण परिस्थिती आहे, अशा भागांमध्ये पाण्याचे टँकर पाठविण्याचे ही काम या महिला मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. बस स्थानकात सुरू असलेल्या ताक वाटपाच्या कार्यक्रमाला रोज वेगवेगळे पदाधिकारी उपस्थित राहून आपली सेवा देतात. या उपक्रमामुळे प्रवाशांना चांगलीच सुविधा उपलब्ध झाली असून प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.