महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : भाजप सत्तेत येण्याची शक्याता? पहा काय म्हणाले रावसाहेब दानवे - रावसाहेब दानवे

जिल्ह्यात जे कामे करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरले आहेत. असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister of State Railways Raosaheb Danve ) यांनी केले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री रोजेश टोपे देखील उपस्थित होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता ( BJP ) येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Maharashtra Crisis
भाजप सत्तेत येण्याची शक्याता? पहा काय म्हणाले रावसाहेब दानवे

By

Published : Jun 26, 2022, 6:06 PM IST

Updated : Jun 26, 2022, 7:46 PM IST

जालना -जिल्ह्यात जे कामे करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून मी फक्त 2 ते 3 दिवस विरोधी पक्षात आहे. अशा प्रकारचे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister of State Railways Raosaheb Danve ) यांनी केले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री रोजेश टोपे देखील उपस्थित होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता ( BJP ) येणार असल्याचे संकेत दिले आहे. आज दानवे तसेच टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ( District Superintendent Agriculture Officer ) कार्यालय, अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे यांनी टोपे यांना उद्देशून भाजप सरकार येणार असे वक्तव्य केले.

भाजप सत्तेत येण्याची शक्याता? पहा काय म्हणाले रावसाहेब दानवे

राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता - राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता देखील दानवे यांनी फेटाळून लावली. तसेच शिंदे गटाशी युती करायची की नाही याबाबत भाजपचे राज्यातील नेते निर्णय घेतील असंही दानवे यांनी म्हटल आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची गुजरातमध्ये कोणतीही भेट झाली नाही असंही दानवे म्हणाले. मात्र आमच्या पक्षाच्या बैठका सुरू असल्या तरी राज्यातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असेही दानवे यांनी नमूद केले. राष्ट्रवादी कायदेशीर लढाई त्यांच्या पद्धतीने लढणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे असे दानवे म्हणाले.

Last Updated : Jun 26, 2022, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details