जालना -जनता कर्फ्यूला जालनाकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. शहरात एकही दुकान उघडे नव्हते. त्यासोबतच पोलिसांनी देखील सर्वत्र हजेरी लावून रस्त्यावरून फिरणाऱ्या तुरळक माणसांचीही चौकशी केली. तसेच, अत्यावश्यक सेवा उदा., दवाखान्याशी निगडीत सेवा घेण्यासाठी निघालेल्या व्यक्तींनाच त्यांनी पुढे जाऊ दिले. इतरांना मात्र, परत पाठविण्यात आले.
बस स्थानकातही आज सुरक्षा रक्षक, कार्यशाळेतील पन्नास टक्के कर्मचारी आणि आगारप्रमुख यांच्याशिवाय कोणीही ही फिरकले नाही. त्यामुळे सर्वत्र शांततेचे वातावरण होते.
जालन्यात शुकशुकाट, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांची पथके तैनात होती. पोलीस अधिकाऱ्यांनी याचा आढावा घेतला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतला. शहरातील वाहतूक बंदचे चित्रीकरणही करण्यात आले. बस स्थानकाचा परिसर शंभर टक्के बंद राहिला. शहरात सर्वच ठिकाणी शंभर टक्के बंद यशस्वी झाला आहे.
जालन्यात शुकशुकाट, ड्रोनमधून दृश्य बंदचा परिणाम विविध घटकांवर झाला. कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना स्वतःच्या रक्षणासाठी बंदिस्त राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, काही दुर्बल घटकांवर यामुळे उपासमारीची वेळ आली.
रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांना तेथून हुसकावून लावण्यात आले. तसेच, या ठिकाणी लोकांची गर्दीच नसल्याचे त्यांना भीक देणारे कोणीच नव्हते. जवळपास सर्वच दुकाने बंद राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळही आली.
जालन्यात शुकशुकाट, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद हेही वाचा - कोल्हापुरात पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; रस्त्यांवर शुकशुकाट
हेही वाचा - जनता कर्फ्यू: सांगलीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद...