महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

LIVE : परतूरमधून बबनराव लोणीकर, जालन्यातून कैलास गोरंट्याल, बदनापूरमधून नारायण कुचे तर भोकरदनमधून संतोष दानवे विजयी - महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ निकाल

परतूरमधून भाजपचे बबनराव लोणीकर, जालन्यातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे, तर भोकरदन मधून भाजपचे संतोष दानवे हे विजयी झाले आहेत. घनसावंगी मतदारसंघाचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Oct 24, 2019, 8:07 AM IST

Updated : Oct 24, 2019, 8:10 PM IST

जालना - राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्ह्यापैकी एक म्हणजे जालना जिल्हा. जिल्ह्यात जालना, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, परतूर हे पाच विधानसभा मतदारसंघांचा निकाल स्पष्ट झाला आहे. परतूरमधून भाजपचे बबनराव लोणीकर, जालन्यातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे, तर भोकरदन मधून भाजपचे संतोष दानवे हे विजयी झाले आहेत. घनसावंगी मतदारसंघाचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

विधानसभा निकाल LIVE :

  • घनसावंगी विधानसभा मतदारसंघ- 21 व्या फेरी अंती हिकमत उढाण यांना 92520 तर राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांना 90029 मते मिळालीत. शिवसेनेचे हिकमत उढाण 2491 मतांनी आघाडीवर आहेत.
  • 5.34 - घनसावंगी विधानसभा मतदारसंघ - 19 वी फेरी - शिवसेनेचे हिकमत उढाण यांना 80798 मते, राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांना- 80824 मते. टोपे 26 मतांनी आघाडीवर
  • 5.13 - परतूर - भाजपचे बबनराव लोणीकर विजयी. लोणीकर - 105784+537(टपाली मते)= 106321 मते. सुरेश कुमार जेथलिया यांना 79735+644(टपाली मते) = 80379 मते मिळाली आहेत. बबनराव लोणीकर यांचा 25942 मतांनी विजय झाला आहे.
  • 4.32 -जालना - 22 वी फेरी - काँग्रेसचे कैलास गोरंट्याल 26037 मतांनी आघाडीवर. एक फेरी बाकी आहे. म्हणजे गोरंट्याल यांचा विजय निश्चित आहे.
  • 4.17 - घनसावंगी - 17 वी फेरी - शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण 3388 मतांनी आघाडीवर
  • 4.16 - जालना - 21 वी फेरी -कैलास गोरंट्याल 25916 मतांनी आघाडीवर
  • 3.18 - जालना- 19 वी फेरी - काँग्रेसचेकैलास गोरंट्याल 27500 मतांनी आघाडीवर
  • 3.11 - बदनापूर -19 वी फेरी- नारायण कुचे (भाजप) - 83003 मते, बबलु चौधरी (राष्ट्रवादी) - 64945 मते, नारायण कुचे 18058 मतांनी आघाडीवर
  • 3.02 - जालना - अठरावी फेरी - काँग्रेसचेगोरंट्याल 25325 मतांनी आघाडीवर
  • 02.36- जालना -17 व्या फेरी अखेर गोरंट्याल 24169 मतांनी पुढे
  • 2.21 -16 व्या फेरी अखेर शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना 42203 तर काँग्रेसच्या गोरंट्याल यांना 65894 मतं मिळली. गोरंट्याल 22716 मतांनी आघाडीवर
  • 1.48 - घनसावंगी -शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण 6923 मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादीचे राजेश टोपे - 4083, हिकमत उढाण -5015
  • 1.28 - जालना - १३ वी फेरी -काँग्रेसचे कैलास गोरंट्याल 19220 मतांनी आघाडीवर
  • 1.26 -जालना-एक लाख 85 हजाराच्या एकूण मतदनापेैकी सुमारे एक लाक मतांची मोजणीपेैकी सुमारे एक लाख मतांची मोजणी झाली आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार कैलास गोरंट्याल 16000 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र, गोरंट्याल मतमोडणी केंद्राच्या ठिकाणी तळ ठोकून आहेत.
  • 1.00- जालना - अकरावी फेरी - काँग्रेसचे गोरंट्याल 16633 मतांनी आघाडीवर
  • 12.37 - बदनापूर- अकरावी फेरी - भाजपचे नारायण कुचे 12145 मतांनी आघाडीवर
  • 12.35 - भोकरदन- 12 वी फेरी - भाजपचे संतोष दानवे 17355 मतांनी आघाडीवर
  • 12.25 - जालना -काँग्रेसचे गोरंट्याल यांना 14164 मतांची आघाडी. खोतकर : 28657 मते, गोरंट्याल : 42821 मते
  • 12.22 -भोकरदन -13 व्या फेरी - भाजपचे संतोष दानवे 18265 मतांनी आघाडीवर
  • 12.20-घनसावंगी मतदारसंघात दहाव्या फेरीअखेर शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांना 6090 मतांची आघाडी. हिकमत उढाण यांना 46129 तर तर राजेश टोपे यांना 40039 मते.
  • 12.10 -परतूर मधून दहाव्या फेरी अखेर भाजपच्या बबनराव लोणीकर 8580 यांना मतांची आघाडी. लोणीकर यांनी मिळाली 40410 मते तर काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांना मिळाली 31830 मते.
  • 12.03 - जालन्यातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल 11 व्या फेरी अखेर 11208 मतांनी आघाडीवर
  • 12.01 -१३ व्या फेरीत परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर यांना 10876 मतांची लीड
  • 11.53 -सहाव्या फेरीअखेर घनसावंगीतून शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांना 1959 मतांची आघाडी
  • 11.55 - बदनापूर मतदारसंघातून सातव्या फेरीअखेर नारायण कुचे यांना 14800 मतांची आघाडी
  • 11.53 -परतूर मधून 10 फेरीअखेर भाजपचे बबनराव लोणीकर 8580 मतांनी आघाडीवर
  • 11.33 -भोकरदन - आठव्या फेरीअखेर भाजपचे संतोष दानवे 11747 मतांनी आघाडीवर
  • 11.28- घनसांवगीतून सहाव्या फेरीअखेर शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण 1524 मतांनी आघाडीवर
  • 11.24 -जालन्यातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल 11008 मतांनी आघाडीवर
  • 11.22 - परतूर मधून आठव्याफेरी अखेर भाजपचे बबनराव लोणीकर 8941 मतांनी आघाडीवर
  • 11.06 -जालन्यातून सातव्या फेरीअखेर काँग्रेसचे गोरंट्याल 5360 मतांनी आघाडीवर
  • 10.55 -जालन्यात शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यात चढ उतार सुरू
  • 10.54 -भोकरदन मधून पाचव्या फेरीअखेर भाजपचे संतोष दानवे 4730 मतांनी आघाडीवर
  • 10.48 - जालन्यातून सहाव्या फेरीअखेर काँग्रेसचे कैलास गोरंट्याल 3152 मतांनी आघाडीवर
  • 10.41 - परतूर मतदारसंघातून सहाव्या फेरी अखेर भाजपचे बबनराव लोणीकर 6970 मतांनी आघाडीवर
  • 10.34-भोरकरदन मतदारसंघातून चौथ्या फेरी अखेर भाजपचे संतोष दानवे 2489 मतांनी आघाडीवर
  • 10.29 -जालन्यातून पाचव्या फेरीत गोरणत्याल यांना 4723 मते मिळाली असून ते 2008 मतांनी आघाडीवर तर खोतकर यांना पाचव्या फेरीत 2226 मते
  • 10.28 -जालन्यातून चौथ्या फेरीनंतर शिवसेनेचे अर्जून खोतकर यांना 14252 मते मिळाली असून ते 550 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना 13702 मते मिळाली आहेत.
  • 10.27 -बदनापूर मतदारसंघातून भाजपचेनारायण कुचे तिसऱ्या फेरीअखेर 4813 मतांंनी आघाडीवर
  • 10.21 -परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर हे सहाव्या फेरी अखेर 6692 मतांनी आघाडीवर आहेत.
  • 10.05 -जालन्यातून चौथ्या फेरीअखेर अर्जून खोतकरांची लीड कमी झाली असून 390 मतांनी आघाडीवर
  • 10.00 -भोकरदन मतदारसंघात राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे 17 मतांनी पुढे
  • 9.41 - घनसांवगीतून तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे राजेश टोपे आघाडीवर
  • 9.40- जालना मतदारसंघातून तिसऱ्या फेरी अखेर अर्जुन खोतकर 1585 मतांनी आघाडीवर
  • 9.34 -परतूर मतदारसंघातून तिसऱ्या फेरीअखेर बबनराव लोणीकर 4248 मतांनी आघाडीवर आहेत.
  • ९.१३-जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर दुसऱ्या फेरीनंतर 447 ने आघाडीवर
  • ९.०८ - संतोष दानवे पहिल्या फेरीत ६५७२ मतांनी आघाडीवर
  • ८.३८ - जालना विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय येथे मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या केंद्रावर जाण्यासाठी पोलीस प्रशासन कसून तपासणी करीत आहेत.
  • ८.१० - सर्व मतमोजणी केंद्रावर पोस्टल मतमोजणीला सुरुवात.
  • ७.30 -भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघासाठी आज भोकरदन येथील नगर परिषद मंगल कार्यालय यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक विभागाच्या वतीने सर्व तयारी झाली असून पोलीस अधिकारी यांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता फक्त कोण निवडणूक येणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांना दुसऱ्यांदा भाजप शिवसेना महायुतीचेच्या वतीने उमेदवारी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार चंद्रकांत दानवे या दोघांमध्ये टक्कर पाहण्यास मिळणार आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिपक बोराडे हे कोणत्या उमेदवाराला वंचित ठेवेल है जनते मध्ये म्हटले जात आहे.
Last Updated : Oct 24, 2019, 8:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details