महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही - राजेश टोपे - rajesh tope on corona third wave

25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाकडून गट क आणि ड या पदासाठीच्या 6 हजार 200 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसवले जाणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली. जॅमर बसवल्यामुळे परीक्षेदरम्यान कॉपीसारख्या प्रकाराला आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

health minister rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Sep 20, 2021, 4:30 PM IST

Updated : Sep 20, 2021, 6:31 PM IST

जालना - सध्यातरी राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र, सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते. लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे

जॅमर बसवल्यामुळे कॉपीला आळा बसेल -

25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाकडून गट क आणि ड या पदासाठीच्या 6 हजार 200 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसवले जाणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली. जॅमर बसवल्यामुळे परीक्षेदरम्यान कॉपीसारख्या प्रकाराला आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडतील, असंही ते म्हणाले.

राज्यात सध्या दररोज 13 ते 14 लाख जणांना लसीकरण करण्यात येत आहे. डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावे, असेही मंत्री टोपे म्हणाले. राज्यात दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा -'कर नाही, तर डर कशाला' पटोले यांचा चंद्रकांत पाटलांना इशारा

Last Updated : Sep 20, 2021, 6:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details