महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात रिक्षा चालकांना गॅस मिळेना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - रिलायन्स पेट्रोल पंप

जालना येथील एलपीजी गॅस पंपावर गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षा चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

जालन्यात रिक्षा चालकांना गॅस मिळेना

By

Published : Aug 24, 2019, 12:10 PM IST

जालना- औरंगाबाद पाठोपाठ आता जालन्यात एलपीजी गॅसवर चालणाऱ्या ऑटो रिक्षांची संख्या वाढली आहे. वाढत्या संख्येसोबतच एलपीजी गॅस पुरवणाऱ्या पेट्रोल पंपातही वाढ झाली आहे. मात्र, जालना-औरंगाबाद मार्गावर असलेला रिलायन्स पेट्रोल पंप असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती झाली आहे. या पंपावर गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जालन्यात रिक्षा चालकांना गॅस मिळेना

या पंपावर जाण्या-येण्यातच रिक्षाचालकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. त्यासोबत येथे फक्त रोखीने व्यवहार केले जातात. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या एलपीजी वाहनधारकांकडे रोख रक्कम नसल्यामुळे कुचंबणा होत आहे.

जालना शहरात किरण ऑइल कंपनी येथे एलपीजी गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, शहराला फक्त या पंपावरील गॅस पुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे शहरात गॅसची टंचाई जाणवत आहे.

या दोन्ही पेट्रोल पंपामुळे एलपीजी वाहनधारकांना होत असलेला मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड याला पायबंद घालण्यासाठी रिक्षाचालकांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन गॅसचा पुरवठा मुबलक प्रमाणात आणि वेळेत करावा, अशी मागणी केली आहे. ज्या वाहनांना एलपीजी गॅसची सवय झाली आहे. ती वाहने पेट्रोलवर चालवण्यासाठी परवडत नाहीत आणि पर्यायाने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. या दोन्ही कचाट्यात सापडलेल्या रिक्षाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी नगरसेवक जयंत भोसले, ज्ञानेश्वर ढोबळे यांच्यासह रिक्षाचालक बाबासाहेब राऊत, वैभव पत्की, शरद राजाळे, रोहन चांदवडे, संजय पाठक, लक्ष्मण चव्हाण आदींची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details