महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना जिल्ह्याला पावसाची पुन्हा हुलकावणी - जालना

बुधवारी सायंकाळी चार वाजेण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. निश्चितच चांगला पाऊस पडेल अशी आशा होती. मात्र, पावसाच्या तुरळक सरीत पडल्याने पुन्हाव एकदा निराशा झाली आहे.

जालना जिल्ह्यात पावसाची पुन्हा हुलकावणी

By

Published : Aug 21, 2019, 9:51 PM IST

Updated : Aug 21, 2019, 11:36 PM IST

जालना - जिल्ह्यात अद्याप पर्यंत समाधनकारक पाऊस झाला नाही. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरीदेखील पाऊस पडला नाही. जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याप्रमाणे वातावरण आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजेण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. निश्चितच चांगला पाऊस पडेल अशी आशा होती. मात्र, पावसाच्या तुरळक सरीत पडल्याने पुन्हाव एकदा निराशा झाली आहे.

जालना जिल्ह्यात पावसाची पुन्हा हुलकावणी

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे हाती आलेली पिके पुन्हा आता माना टाकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. जर समाधनकारक पाऊस झाला नाही तर परिस्थिती अजिनच बिकट होणार आहे. त्यामुळे पाऊस पडणे अत्यंत गरजेचे आहे. पाऊस कमी झाल्यामुळे उन्हाळ्या प्रमाणेच पाणीटंचाई सुरू आहे. बुधवारी पावसाने हुलकावणी दिली असली, तरी वातावरण मात्र पाऊस पडेल असे संकेत देत आहे.

दरम्यान, वार्षिक सरासरीच्या फक्त चाळीस टक्केच पाऊस आतापर्यंत झाला आहे .मागील वर्षी देखील जवळपास अशीच परिस्थिती होती. गेल्या वर्षी याच काळामध्ये 32 • 50 टक्के पाऊस पडला होता.

Last Updated : Aug 21, 2019, 11:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details