जालना - राज्य शासनाने नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, जाण्यापूर्वी संबंधित जिल्ह्याच्या आरोग्य प्रशासनाकडून फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. उन्हामध्ये मुलाबाळांसह नागरिक उभे होते. विशेष म्हणजे रांगेमध्ये परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची जास्त संख्या आहे.
जालना जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय; तपासणीसाठी गर्दी - jalna covid 19
सामान्य रुग्णालयातून प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय परराज्यात किंवा महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही भागात जाता येत नाही. आजपर्यंत जालना जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची संख्या 5 हजार 391 आहे. तर जालना जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जाणार्या नागरिकांची संख्या 680 एवढी आहे.
सामान्य रुग्णालयातून प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय परराज्यात किंवा महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही भागात जाता येत नाही. आजपर्यंत जालना जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची संख्या 5 हजार 391 आहे. तर जालना जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जाणार्या नागरिकांची संख्या 680 एवढी आहे. त्यामुळे जालन्यामध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांची संख्या लक्षणीय होती हे दिसत आहे. यादरम्यान लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेक कामगारांनी आपापल्यापरीने जालन्यातून काढता पाय घेतला आहे.