जालना -शेतकरी बांधव शुद्ध बीजाची निवड करून पेरणी करतो. त्यातून कसदार अन्नधान्य उत्पादन करतो. त्याचप्रमाणे साहित्यिकांनी देखील कसदार साहित्य निर्माण करावे. शेतकरीवर्गाला बळ देण्यासाठी देखील साहित्यिकांनी प्राधान्याने लेखन करावे, अशी अपेक्षा साहित्यिक तथा किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केली.
शहरातील जे. ई. एस. महाविद्यालयात कवी बी. रघुनाथ साहित्य मित्र पुरस्काराचे वितरण अमर हबीब यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सुधाकर जाधव यांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला रोख पाच हजार रुपये, शाल श्रीफळ आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा दत्तात्रय गोविंदराव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आणि भाषा, साहित्य, संस्कृती, आणि संशोधन परिषद जालना शाखेच्यावतीने करण्यात आले होते.
हेही वाचा - आमदाराचं दत्तक गाव-पाण्यासाठी धावाधाव, खोतकरांच्या नंदापूरमध्ये ४ रुपयाला हंडा