जालना -ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून शेजारच्या जिल्ह्यात विक्रीसाठी अवैध मार्गाने जात असलेला देशी दारूचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे. पोलिसांनी एकूण ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा -'टॉमी' म्हणणाऱ्यांना योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ - राज्यमंत्री अब्दुल सत्तार
जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत, आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सर्वत्र नजर आहे. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत देशी दारू परजिल्ह्यात विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली होती. तसेच, लक्कडकोट परिसरातील एका देशी दारूच्या दुकानातून सीलबंद देशी दारूचे बॉक्स एका कारमध्ये टाकून काही जण जात असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास लक्कडकोट भागात एका चॉकलेटी रंगाच्या इंडिगो कार (क्र. एम.एच 28 व्ही 2848) मधून दारूसाठा जप्त केला.