जालना- मागील वर्षी पावसाळ्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, मान्सून परतल्यानंतर मुसळधार पावसाने अवघ्या पंधरा दिवसांतच चार महिन्यांची कसर भरून काढली. त्याचा परिणाम असा झाला, की आज जालना जिल्ह्यातील फक्त 37 गावे आणि 16 वाड्यांना 40 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
जालना जिल्ह्यात पाणीटंचाई, टँकर भरण्यासाठी 35 विहिरी अधिग्रहीत - जालना पंचायत समिती
जिल्ह्यात एकूण 68 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये घनसांगी 18, अंबड 14, बदनापूर 18, जालना 5, जाफराबाद 8 या विहिरींचा समावेश आहे. यापैकी 35 विहिरी या टँकर भरण्यासाठी तर 23 विहिरी या टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
जालना जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सरतेशेवटी पाणीटंचाई
जिल्ह्यात एकूण 68 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये घनसांगी 18, अंबड 14, बदनापूर 18,जालना 5, जाफराबाद 8 अशा एकूण 68 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी 35 विहिरी या टँकर भरण्यासाठी तर 23 विहिरी या टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.