जालना - भोकरदन तालुक्यातील कल्याणी गावातील शेतकरी लयनोसींग बसराज मुर्हाडे यांच्या शेतात बैल बांधलेला होता. रात्री अचानक बिबट्याने बैलावर हल्ला करून फडशा पाडला. बैलाचा मुत्यू झाल्याची घटना सकाळी शेतकर्याला कळाली. ही घटना परिसरात वार्यासारखी पसरल्याने शेतकरी आणि गांवकर्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
बिबट्याने पाडला बैलाचा फडशा; कल्याणी गावातील घटना - घटना
गावातील पोलीस पाटील संजय पैठणकर व ग्रामस्थ उपस्थीत होते. तर वाकडी येथे सुध्दा रात्री लांडग्याने ४ बकर्याचा फडशा पाडला. यामध्ये शेतकर्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती वनविभाग, पशुवैघकीय अधिकारी, तलाठी यांना कळवण्यात आली. वनविभागाचे संतोष दोडके, दिलीप जाधव तसेच जळगाव सपकाळ येथील पशुवैघकीय अधिकारी शिवकुमार पाटील, तलाठी एस.एस.जकाते यांनी पंचनामा केला आहे. यावेळी गावातील पोलीस पाटील संजय पैठणकर व ग्रामस्थ उपस्थीत होते. तर वाकडी येथे सुध्दा रात्री लांडग्याने ४ बकर्याचा फडशा पाडला. यामध्ये शेतकर्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
परिसरातील अनेक गावामध्ये पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गाव शिवारात येत असून जनावरांना आपला शिकार बनवत आहेत. यामध्ये जळगाव सपकाळ, करजगांव, कल्याणी, आडगांव, दहिगांव, आन्वा, हिसोडा या गावातील ग्रामस्थांमध्ये बिबट्या, तडस, लांडगा, खेडशा वाघ या प्राण्याची दहशत दिसत आहे. त्यामुळे जनावरावरील हल्ले वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या घटनेविषयी वनविभागाचे संतोष दोडके यांनी सांगितले की, हा हल्ला बिबट्यानेच केला आहे. पाण्याच्या शोधात हा बिबट्या दुरवरुन परिसरात भटकत आला असे त्यांनी सांगितले. वनविभागाचे अधिकारी व पशुवैघकीय अधिकारी यांनी पंचनामा केला आहे.