बदनापूर (जालना) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तसेच अनलॉकची सुरुवात झाल्यानंतरही अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांकडून बदनापूर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला होता. हा गुटखा आज जाळून नष्ट करण्यात आला.
जालना : लॉकडाऊनमध्ये जप्त केलेला लाखो रुपयांचा गुटखा अखेर जाळून नष्ट - jalna latest news
लॉकडाऊनमध्ये जप्त केलेला लाखो रुपयांचा गुटखा बदनापूर पोलिसांनी जाळून नष्ट केला.
जालना : लॉकडाऊनमध्ये जप्त केलेला लाखो रुपयांचा गुटखा अखेर जाळून नष्ट
कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये याकरिता सुरुवातीच्या काळात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. या लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री सुरू होती. या अवैध गुटखाविक्री करणाऱ्यांकडून साडे नऊ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. हा गुटखा पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बदनापूर पोलीस तसेच अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हा गुटखा आज दुपारी बदनापूर जवळील गायरानात जाळून नष्ट केला.