महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्रीडांगणाच्या जागेवर अवैध वाळू उपसा, 65 ब्रास वाळू जप्त - Jalna illegal sand extraction news

बदनापूर तालुक्यात वाळू माफियांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, वरूडी येथील क्रीडांगण थेट उत्खनन करून नष्ट करण्याचा प्रयत्न वरुडी गावातील तरुणांच्या सतर्कतेमुळे फोल ठरला.

Lahuki river illegal sand extraction
बदनापूर वाळू उपसा प्रकरणी पंचनामा करताना अधिकारी आणि गावकरी

By

Published : May 27, 2020, 7:10 PM IST

जालना -वरूडी गावातील लहुकी नदीकाठी ग्रामपंचायतने क्रीडांगणासाठी दिलेल्या जागेशेजारी लहुकी नदी पात्रातून प्रचंड वाळू उपसा करण्यात येत होता. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर तलाठी यांनी पंचनामा करून जवळपास 65 ब्रास वाळू जप्त करून ग्रामपंचायतच्या ताब्यात दिली.

बदनापूर वाळू उपसा प्रकरणी पंचनामा करताना अधिकारी आणि गावकरी

बदनापूर तालुक्यातील वरूडी येथे ग्रामपंचायतने लहुकी नदीशेजारी असणारी जागा क्रीडांगणासाठी राखीव ठेवलेली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून वाळू माफियांची नजर या क्रीडांगणावर पडली त्यांनी या ठिकाणची वाळू काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांनी याला विरोध करून क्रीडांगणावर अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर मंडळ अधिकारी लक्ष्मण करकुंभे यांच्यासह तलाठी आणि इतर महसूल अधिकाऱ्यांनी आज (27 मे) या ठिकाणी ग्रामस्थांसह भेट दिली. यावेळी त्यांना क्रीडांगणाजवळील नदी किनारी अवैध उत्खनन करून नदी पात्राजवळील क्रिडांगणावर वाळूचे चार ढिग आढळून आले. या ढिगांचे मोजमाप केले असता जवळपास ही वाळू 65 ब्रास असल्याची दिसून आली.

बदनापूर वाळू उपसा प्रकरणी पंचनामा करताना अधिकारी आणि गावकरी

जप्त केलेला वाळूचा साठा ग्रामपंचायतचे सरपंच संध्या भिसे व ग्रामपंचायत शिपाई देवगिर श्रीराम गिरी यांच्या ताब्यात ताबा पावती देऊन हस्तातंरीत करण्यात आला. तालुक्यात वाळू माफियांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, वरूडी येथील क्रीडांगण थेट उत्खनन करून नष्ट करण्याचा प्रयत्न वरुडी गावातील तरुणांच्या सतर्कतेमुळे फोल ठरला.

ABOUT THE AUTHOR

...view details